दररोज ‘मृतदेह’ आढळत असल्यानं ‘या’ शहरात खळबळ, 4 दिवसात मिळाल्या 4 ‘डेडबॉडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील छपरा शहरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे येथील नागरिक दहशतीखाली असून काल पुन्हा एकदा शहरातील भगवानपूर भागामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मागील आठवड्यापासून आतापर्यंत चार मृतदेह आढळले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लहान मुलांचा देखील मृतदेह –
या मृतदेहांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश असून यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आहे. हत्या करून यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. 11 ऑक्टोबर रोजी एका मुलाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी मुलीचा, 13 ऑक्टोबर रोजी महिलेचा आणि 14 ऑक्टोबर रोजी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून ताब्यात घेण्यात आलेल्या मृतदेहांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच मृतदेहांची ओळख पटवण्याचे देखील प्रयत्न सुरु असून यामागील कारणांचा देखील शोध घेतला जात आहे.

नागरिकांमध्ये भीती –
पाणी कमी झाल्यानंतर हे मृतदेह आढळून आले असून पोलीस याचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलिसांनी हत्येचा आरोप फेटाळून लावला असून पोस्टमोर्टम अहवालात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तसेच एकामागोमाग एक मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी