NCL Recruitment 2020 : 10-12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी, परिक्षेविना होणार भरती, जाणून घ्या किती जागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (NCL) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 480 पदे नियुक्त केली जाणार आहेत. या पदासांसाठी दहावी – बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता
HEMM मेकॅनिक आणि माइन इलेक्ट्रिशियनच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य वेल्डर आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांवर नोकरी मिळू शकते.

वयाची मर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.

असा करा अर्ज
या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत http://nclcil.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. तसेच यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in/ वर जाऊन पाहू शकता.