Satara Crime | बकासुर टोळीचा म्होरक्या व त्याच्या 16 साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानदार आणि धनवानांकडून हफ्तेवसुली आणि गुंडगिरी करून साताऱ्याच्या गुन्हेगारी (Satara Crime) विश्वात हातपाय पसरू लागलेल्या बकासुर टोळीवर महाराष्ट्र पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. बकासुर टोळीचा म्होरक्या यश नरेश जांभळे आणि त्याच्या 16 साथीदारांवर मोक्का (Satara Crime) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सातारा शहरात गुन्हेगारी कृत्यांवर वचक बसवला जाईल.

 

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांची साताऱ्यातील गुंड टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या बकासुर टोळीतील गुंडांविरुद्ध अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. साताऱ्यातील आर्यन विशाल कडाळे या तरुणाकडे या टोळीने हप्ता मागितला होता. पण कडाळे याने हप्ता न देता या टोळीच्या विरोधात पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे या टोळीने आर्यनला हप्ता दुप्पट करण्याची धमकी दिली होती. तरीदेखील हफ्ता न दिल्याने यश जांभळे आणि त्याच्या टोळीने कडाळेला त्याच्या भागात जाऊन भरदिवसा चाकूने भोसकले होते. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. (Satara Crime)

 

या टोळीला आवर घालण्यासाठी शहूपुरी पोलीस ठाण्याचे (Shahupuri Police Station) पोलीस निरीक्षक संजय पतंगे (Police Inspector Sanjay Patange) यांनी या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून यश जांभळे आणि इतर 16 जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईला जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

टोळी प्रमुख यश नरेश जांभळे, राहुल संपत बर्गे, टेटया ऊर्फ गौरव अशोक भिसे,
ऋषिकेश ऊर्फ शुभम हणमंत साठे, अनिकेत उदय माने, आदित्य सुधीर जाधव, शंतनू राजेंद्र पवार,
अनिकेत सुभाष पारशी, पिन्या ऊर्फ सुनील माणिकराव शिरतोडे एक अनोळखी तरुण आणि 7 विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.

 

Web Title :- Satara Crime | bakasur-gang-leader-mcoca-mokka-against-16-companions-satara-police crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Zee Marathi | झी मराठीवरील ‘हा’ शो घेणार प्रेक्षकांचा निरोप ; तर ‘या’ नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Chandrakant Patil | वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Malaika Arora | अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावले खडे बोल; म्हणाली “तो मर्द आहे…”