Satara Lok Sabha | उमेदवारीसाठी दिल्लीत तळ ठोकलेल्या उदयनराजेंना धक्का, नरेंद्र पाटील म्हणाले, भाजपाने मला संधी द्यावी

सातारा : Satara Lok Sabha | भाजपाने (BJP) कमळ या चिन्हावर सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला द्यावी. माझे ग्रामीण भागात चांगले काम आहे. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे. यावेळी भाजपने मला संधी द्यावी. माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंग्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मला संधी देतील, अशी आशा आहे, असे म्हणत भाजपा नेते आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी साताऱ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे.

सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून उदयनराजे (Udayanraje Bhosale) तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. अजूनही भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांना भेट दिलेली नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय भाजपा नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याच्या जागेवर दावा केल्याने उदयनराजेंसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. आज पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी हा दावा केला.

नरेंद्र पाटील म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात छत्रपती उदयनराजेंसमोर लढायला कुणीच उमेदवार तयार नव्हते. पण भाजपाने मला शिवसेनेत जाऊन निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मी शिवसेनेतून निवडणूक लढलो आणि मला साडेचार लाखांच्यावर मते मिळाली. छत्रपती उदयनराजेंनाही तेवढ्याच प्रमाणात मते मिळाली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता.(Satara Lok Sabha)

नरेंद्र पाटील म्हणाले, उदयनराजे हे तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत.
मात्र त्यांना भेट मिळत नाही, हे ऐकून मलाही खूप वाईट वाटले. एकाबाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो, दुसऱ्या बाजूला
ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहेत. अशावेळी त्यांना जर भेट मिळत नसेल तर त्यांनी हा पेच समजून घ्यायला हवा.

ते पुढे म्हणाले, उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे होते. महायुतीमध्ये लढत असताना अजित पवार गट आणि भाजपाने
सातारा लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करायला हवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग