‘जीन्स’मध्ये घुसून बसून राहिला ‘विषारी’ साप, खांबाला पकडून 7 तास उभा राहिला ‘तरूण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विद्युत पोल लावणारा एक मजूर झोपायला गेला तेव्हा त्याच्या शर्टमध्ये विषारी साप शिरला आणि जीन्स पॅन्टच्या आत गेला. मजूर जागा झाल्यावर त्याने एका खांबाला धरले आणि रात्री 12 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तिथेच उभा राहिला जेणेकरून गडबड झाल्यावर साप चावणार नाही. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्यातील आहे.

जींस में घुसकर बैठा रहा जहरीला सांप, खंभा पकड़कर 7 घंटे खड़ा रहा युवक

ही घटना जमालपूर परिसरात येणाऱ्या सिकंदरपूर गावची आहे, जिथे अंगणवाडी केंद्रात परिसरातील विद्युत विभागामार्फत विद्युत पोल व वायर बसविण्याचे काम करणारे कामगार थांबले होते. रात्री सर्व कामगार स्वयंपाक झाल्यावर जेवण करून झोपले. झोपेत असताना एक विषारी साप लव्हलेश कुमारच्या शर्टमधून घुसत त्याच्या जीन्स पँटमध्ये घुसला.

जींस में घुसकर बैठा रहा जहरीला सांप, खंभा पकड़कर 7 घंटे खड़ा रहा युवक

साप पॅन्टमध्ये शिरल्यानंतर जेव्हा त्या युवकाला कळले तेव्हा तो तेथे शांतपणे 7 तास खांबाला धरून उभा राहिला. यावेळी विषारी साप त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये बसून राहिला. सकाळ झाल्यानंतर नंतर स्थानिक लोकांनी जवळच्या एका सर्पमित्राला बोलावून कसेतरी प्रयत्न करून सापाला जीन्स पॅन्टमधून बाहेर काढले, तेव्हा कुठे त्या तरूणाचा जीव वाचला.

गावातील लोकांचे म्हणणे आहे की रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा तरुण 7 तास खांबाला धरून उभा राहिला, तेव्हा कुठे त्याचा जीव वाचू शकला. येथे प्रचंड गर्दी देखील जमा झाली होती. या काळात त्या सापाने त्या तरुणाला चावा घेतला नाही ही विशेष बाब आहे. पंचायत सदस्य महेश सिंह म्हणाले की, रात्री मजूरच्या शर्टमधून साप त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये घुसला. रात्री 12 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत मजूर खांबाला धरून उभा राहिला. सकाळी सर्पमित्राला बोलावण्यात आले, तेव्हा कुठे साप बाहेर पडला. त्यावेळी तेथे खूप गर्दी जमा झाली होती.