UAN नंबर शिवाय ‘या’ पध्दतीनं सहज तपासा PF Balance आणि पीएफ खात्यातून रक्कम काढा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा यूएएन नंबर जनरेट न झाल्याने किंवा नंबर विसरल्याने कर्मचारी आपला ईपीएफ बॅलन्स चेक करणे आणि पीएफ अकाऊंटमधून पैसे काढताना मोठया अडचणींचा सामाना करावा लागतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, यूएएन नंबर शिवाय सुद्धा कर्मचारी आपला ईपीएफ बॅलन्स चेक करू शकतात आणि पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतात. यूएएन, अर्थात यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर एक 12 अंकी यूनिक नंबर असतो. हा नंबर ईपीएफ सदस्याला देण्यात येतो. हा एक कायमस्वरूपी नंबर असतो आणि एका सदस्यासाठी तो पूर्ण जीवनभर वैध राहातो.
यूएएन नंबर कर्मचार्याची कंपनी जनरेट करू शकते. नोकरी बदलण्याच्या प्रकरणात, अगोदर मिळालेलाच यूएएन कंपनीकडून दिला जाऊ शकतो. यूएएनद्वारे कर्मचारी कंपनीच्या मदतीशिवाय कधीही आपला पीएफ बॅलन्स जाणून घेवू शकतो. तसेच पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतो.
अशाप्रकारे यूएएनशिवाय जाणून घ्या ईपीएफ बॅलन्स
स्टेप -1. सर्वप्रथम epfindia.gov.in वर जाऊन लॉग-इन करा.
स्टेप -2. आता Click Here to Know your EPF Balanc लिंकवर क्लिक करा.
स्टेप -3. आता epfoservices.in/epfo/ वर रीडायरेक्ट व्हाल. आता तुम्हाला Member Balance Information टॅबवर क्लिक करावे लागेल.
स्टेप -4. आता तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि आपल्या ईपीएफओ ऑफिस लिंकवर क्लिक करावे लागेल.
स्टेप -5. आता तुम्हाला तुमचा पीएफ अकाऊंट नंबर, नाव आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.
स्टेप -6. आता तुम्हाला सबमिटवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स स्क्रीनवर दिसेल.
अशाप्रकारे यूएएनशिवाय काढा पीएफ खात्यातून रक्कम
जर तुमच्याकडे यूएएन नंबर नसेल, तर तुम्हाला पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी एक पीएफ विड्रॉल फॉर्म भरावा लागेल आणि तो स्थानिक पीएफ ऑफिसमध्ये जाऊन जमा करावा लागेल. ईपीएफ सदस्याला यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आधार-बेस्ड नवीन समग्र क्लेम फॉर्म किंवा नॉन-आधार समग्र क्लेम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्ही हा फॉर्म भरून पीएफ अकाऊंटमधून आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढू शकता. इपीएफ अकाऊंटमूधन पूर्ण रक्कम कर्मचारी त्या स्थितीत काढून शको, जेव्हा त्याची रिटायर्डमेंट झाली असेल किंवा कर्मचारी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल. जर एखादा ईपीएफ सदस्य एक महिन्यापर्यंत बेरोजगार असेल, तर तो पेन्शन फंडातून आपल्या एकुण पीएफ रक्कमेच्या 75 टक्के भाग काढू शकतो.