कामाची गोष्ट ! पगारावर घर खर्च भागत नाही तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्यानं वाढेल कमाई, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा बँक खात्यात सॅलरी येते तेव्हा ती पाहून खुप चांगले वाटते. आपल्या बँक खात्यात आपल्या मेहनतीच्या कमाईचा अनुभव काही खासच असतो. मात्र, अनेक लोक, विशेषकरून ज्यांना पहिलाच जॉब नुकताच लागला आहे, त्यांना हे माहित नसते की त्यांना आपल्या सॅलरीचे व्यवस्थापन कसे करायचे आहे. जर तुम्ही तुमचे पैसे वेळेवर बचत केलेत आणि ते चांगल्या ठिकाणी गुंतवले तर तुम्ही रिटायर्डमेंटची योजना बनवू शकता, आणि आपले आर्थिक उद्दीष्ट प्राप्त करू शकता. येथे काही स्मार्ट टिप्स देत आहोत, ज्या तुम्हाला सॅलरीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करतील.

हे लक्षात ठेवा
1. अगोदर बचत, नंतर खर्च
तुम्हाला तुमचे पैसे खर्च करण्याचा विचार पूर्णपणे बदलावा लागेल. खर्च केल्यानंतर जे शिल्लक राहिले आहे, ते वाचवण्यापेक्षा, अगोदर बचत आणि नंतर जे शिल्लक आहे त्यातून खर्च करण्याचे लक्ष्य ठेवा. हे थोडे अवघड वाटेल, कारण बहुतांश लोकांना बचतीचे महत्व समजत नाहीत. पण, हे खुप सोपे आहे. तुम्हाला केवळ आपल्या मासिक खर्चाला ट्रॅक करायचे आहे आणि पुन्हा पुढील महिन्याच्या हिशेबाने आपल्या खर्चाची योजना बनवायची आहे. एकवेळ जेव्हा तुम्हाला आपल्या आवश्यक खर्चाचा अंदाज येतो, तेव्हा जेव्हा तुमची सॅलरी येईल, तेव्हा तुम्ही प्रथमपासूनच उर्वरित रक्कम वाचवू शकता.

2. इमर्जन्सी फंड सेव्हिंग
जेव्हा तुम्ही पैसे वाचवत असता, तेव्हा तुम्हाला या दोन भागात ते विभागले पाहिजेत. तुमच्या बचतीचा एक भाग आणि एक भाग इमर्जन्सी फंडमध्ये जाईल. तर दुसरा आर्थिक लक्ष्यांसाठी असला पाहिजे. आयुष्यात पुढे काय आहे हे कुणालाच माहिती नसते, अचानक तुम्हाला किती पैशांची गरज लागणार हे माहित नसते, किंवा कोणता प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो, हे देखील माहित नसते. अशावेळी इमर्जन्सी फंड उपयोगी येतो. आपला इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी, आपला मासिक खर्च मोजा, ज्यामध्ये बिल, घरभाडे, किराणा सामान, फोन बिल आणि अन्य खर्च असतील. आता या संख्येला 6 ने गुणा, कारण तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये अशी रक्कम असावी जी कमीतकमी सहा महिने तुमच्या व्यक्तीगत खर्चाची देखभाल करू शकते.

3. खर्चावर लक्ष ठेवा
कुणी म्हणू शकतात की, आमचा खर्च जास्त आहे, तर आमची बचत कशी होईल. ही ती जागा आहे जेथे एक योग्य खर्च योजना येते. आपल्या कर्जाची परतफेड, घरभाडे इत्यादीच्या यादीत सर्वात वर बचत असावी. कधी-कधी लोक आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात. हे दुष्टचक्र आहे जे तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत तुम्ही स्मार्ट आर्थिक निर्णय घेत नाही. आपल्या निर्धारित खर्चांची यादी बनवा जसे की, भाडे, वीज बिल, लोन ईएमआय इत्यादी जे तुम्ही प्रत्येक महिन्याला देता. हे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात योग्य संतुलन ठेवण्यास संक्षम बनवते. जेणे करून प्रत्येक महिन्यात बँक खात्यातून स्वयंचलित पद्धतीने डेबिट होईल.

4. बोनस, भत्ते
अनेकवेळा तुम्हाला बोनस किंवा विशेष भत्ते मिळतात. जेव्हा अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा अनावश्यक खर्च करू नका. हे पैसे खर्च न करण्यासाठी स्वताला रोखा.