SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI ATM Withdrawal Rule Changed | तुम्ही जर पैसे काढण्यासाठी नियमित एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (Bank State Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल (SBI ATM Withdrawal Rule Changed) केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून येणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाल एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागणार आहे.

 

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपी शिवाय पैसे काढू शकणार नाही. रोख रक्कम काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी प्राप्त होतो, तो प्रविष्ट केल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.

 

 

ट्विटमध्ये माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक (Cheating) करणाऱ्यांविरुद्ध परिणामकारक ठरणारी आहे. फसवणुकीपासून खातेधारकांचं संरक्षण करणं हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. हे नियम 10 हजार रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर लागू आहे. 10 हजारावरील रक्कम काढण्यासाठी आता ओटीपी टाकावा लागणार आहे.

 

पैसे काढण्याचे नवीन नियम

– एसबीआय एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल.
– यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
– ग्राहकाला एकाच व्यवहारासाठी चार अंकी क्रमांकासह ओटीपी मिळेल.
– रोख रक्कम काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.

 

Web Title :- sbi changed atm cash withdrawal rule otp based cash withdrawal from atm see full process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा