SBI ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज ऑनलाइन बँकिंगमध्ये येऊ शकतात अडचणी

नवी दिल्ली : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) ग्राहक असाल आणि ऑनलाइन बँकिंग करत असाल, तर रविवार 8 नोव्हेंबरला आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एसबीआय आपल्या ग्राहकांचा ऑनलाइन बँकिंगचा अनुभव चांगला बनवण्यासाठी आपल्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मला अपडेट करत आहे. या कारणामुळे 8 नोव्हेंबरला इंटरनेट बँकिंग, एसबीआय योनो आणि योनो लाइट सेवेचा वापर करताना काही अडचणी येऊ शकतात. स्टेट बँकेने ट्विट करून याबाबतची माहिती ग्राहकांना दिली आहे.

एसबीआयने ट्विट करून लिहिले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करत आहोत की, चांगल्या ऑनलाइन बँकिंगच्या अनुभवासाठी आम्ही आमचे इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपडेट करत आहोत.

एसबीआय खातेधारक आपला बॅलन्स जाणून घेण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून टोल-फ्री नंबर 66 9223766666 वर एक मिस्ड कॉल करू शकतात. एसबीआयमधून बॅलन्स जाणण्यासाठी 09223766666 वर BAL एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला मॅसेजच्या माध्यमातून शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.

ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणे पाहाता एसबीआय आपल्या खातेधारकांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन बँकिंगसाठी वेळोवळो अलर्ट जारी करत असते. आता ऑनलाइन बँकिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी प्लॅटफॉर्म अपडेट करण्यात येत आहे.