SBI च्या कोट्यावधी ग्राहकांना झटका ! बँकेनं पुन्हा कमी केलं FD वरील ‘व्याज’दर, जाणून घ्या नवे ‘रेट’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही फिक्सड डिपॉजिट म्हणजे एफडी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयने एफडीच्या दरात बदल केले आहेत, म्हणजे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे आता एफडी करणार्‍यांना कमी फायदा होईल. एसबीआयने जारी केलेले एफडी दर 10 फेब्रुवारी 2020 पासून लागू होतील. बँकेने 1 वर्ष ते 10 वर्षात मॅच्युअर होणार्‍या लाँग टर्म डिपॉजिट्सवर एफडीच्या दरात 0.10 टक्के ते 0.50 टक्के पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे.

एसबीआयमध्ये एफडी केल्यास आता मिळेल एवढे व्याज

(1) 7 दिवस ते 45 दिवसांसाठी 4.5 टक्के

(2) 46 दिवस ते 179 दिवसांसाठी 5 टक्के

(3) 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 5.50 टक्के

(4) 211 दिवस ते 1 वर्षासाठी 5.50 टक्के

(5) 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंत 6 टक्के

(6) 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत 6.10 टक्के

(7) 3 वर्ष ते 5 वर्षपर्यंत 6 टक्के

(8) 5 ते 10 वर्षांपर्यंत 6 टक्के

एसबीआयचे सिनियर सिटीजनसाठी नवीन एफडी व्याज दर

(1) 7 ते 45 दिवसांसाठी 5 टक्के

(2) 46 दिवस ते 179 दिवसांसाठी 5.5 टक्के

(3) 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 6 टक्के

(4) 211 दिवस ते 1 वर्षासाठी 6 टक्के

(5) 1 वर्ष ते 2 वर्षासाठी 6.5 टक्के

(6) 2 वर्ष ते 3 वर्षासाठी 6.5 टक्के

(7) 3 वर्ष ते 5 वर्षासाठी 6.5 टक्के

(8) 5 वर्ष ते 10 वर्षांसाठी 6.50 टक्के