SBI कडून ग्राहकांसाठी मोठी घोषणा ! आता घरबसल्या घ्या ‘या’ 8 सर्व्हिसचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) इंटरनेट बँकिंग पोर्टलवरून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. या सर्व्हिसमध्ये एसबीआय ग्राहक आपला अकाऊंट बॅलन्स चेक करू शकतात, नवीन चेकबुकसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. या सर्व्हिसशिवाय एसबीआय (एसबीआय) मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट आणि आवर्ती जमा खाते बनवण्याची सुविधा मिळते. इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी युजरनेम आणि लॉगिन पासवर्डची आवश्यकता असते.

एसबीआय इंटरनेट बँकिंग सुविधा तुम्हाला तुम्हाला तुमच्या घराची सुरक्षा आणि सुविधेतून बँकिंग व्यवहार करण्याची परवानगी देते. बँकेच्या या सर्व्हिसने तुम्ही कुठेही आणि कधीही व्यवहार करू शकता.

घरबसल्या करा ही कामे

एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून सांगितले आहे की, ग्राहक घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे एकुण 8 कामे करू शकतात.

ही आहेत ती 8 कामे

पैशांचा व्यवहार, एटीएम कार्डसाठी अप्लाय करणे, डिपॉझिट अकाऊंटशी संबंधित कामे, बिलाचे पेमेंट, सेव्हिंग बँक खाते स्टेटमेंट, चेक बुकसाठी अ‍ॅपलाय करणे, युपीआय सुरू किंवा बंद करणे, टॅक्सचे पेमेंट करणे.

अशाप्रकारे सुरू करा इंटरनेट बँकिंग
यापूर्वी नेट बँकिंग सुविधेसाठी खातेधारकांना बँकेच्या शाखेत जावे लागत होते. तेथे एक फॉर्म भरावा लागत होता. नंतर सुविधा सुरू करण्यापूर्वी निर्देशांच्या प्री-प्रिंटेड किटची वाट पहावी लागत होती. मात्र आता एसबीआयच्या ब्रांचमध्ये न जाता घरातूनच तुम्ही एसबीआय नेटबँकिंग सुविधेसाठी रजिस्टर करू शकता. हे काम पूर्णपणे ऑनलाइन केले जाऊ शकते. कसे ते जाणून घेवूयात…

1 एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा.
2 यानंतर New User Registration/Activation वर क्लिक करा.
3 अकाऊंट नंबर, सीआयएफ नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, जरूरी फॅसिलिटी नोंदवा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
4 यानंतर रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल.
5 आता एटीएम कार्ड निवडा आणि जर तुमच्याकडे अढच कार्ड नसेल तर पुढील प्रक्रिया बँक पूर्ण करते.
6 टेम्पररी युजरनेम नोट करा आणि लॉग-इन पासवर्ड बनवा. (पासवर्डमध्ये आठ शब्दांसह स्पेशल वर्डचा वापर करा) पासवर्ड पुन्हा नोंदवा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
7 टेम्पररी युजरनेम आणि नव्या पासवर्डसह लॉग-इन करा.
8 आपल्या पसंतीचे युजरनेम बनवा, जो तुमचा कायमस्वरूपी यूजरनेम असेल.
9 नियम आणि अटी स्वीकारल्यानंतर आणि लॉग-इन पासवर्ड आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करा आणि काही प्रश्नांना निवडा आणि उत्तर तयार करा.
10 जन्म दिनांक, जन्मठिकाण आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर नोंदवा.
11 बँक अकाऊंटची माहिती पाहण्यासाठी अकाऊंट समरी लिंकवर क्लिक करा.

जर तुम्ही View only right सोबत रजिस्टर्ड आहात, तर आपल्या ऑनलाइन रजिस्टेशन प्रक्रियेच्या प्रिंटआऊटसह आपल्या Transcation right ला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी आपल्या शाखेशी संपर्क साधा.

जर अगोदरपासूनच तुम्ही रजिस्टर्ड आहात आणि पासवर्ड विसरला आहात तर जाणून घ्या ही पद्धत

1.www.onlinesbi.com वर जा.
2.‘फॉरगॉट लॉगिन पासवर्ड’ पर्यायावर क्लिक करा. यानंतर पुढील पेजवर ‘नेक्स्ट’ वर क्लिक करा.
3. आता दिलेल्या स्पेसमध्ये एसबीआय नेटबँकिंगचा तुमचा यूजरनेम, अकाऊंट नंबर, देश, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, जन्म दिनांक आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
4. आता तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी एंटर करून कन्फर्म वर क्लिक करा.
5. आता लॉगिन पासवर्ड रीसेट करण्याचे 3 पर्याय येतील. हे तीन पर्याय – एटीएम कार्ड डिटेल्सद्वारे, प्रोफाइल पासवर्डद्वारे आणि एटीएम कार्ड.
6. प्रोफाइल पासवर्डशिवाय लॉगिन पासवर्ड रिसेट करायचा आहे.