SBI च्या ‘या’ नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही एसबीआय बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. एसबीआयने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन काही बदल केले आहेत. या बदलांनुसार, एसबीआय ग्राहक आता फक्त त्याच फोन नंबरवरून एसबीआयच्या योनो अ‍ॅप्लिकेशनवर लॉग इन करू शकता जो मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. म्हणजेच आता तुम्ही इतर कोणत्याही क्रमांकावरून बँकेची सेवा घेऊ शकत नाही. (SBI)

 

अनेक ग्राहकांचा बँकेत खात्याला लिंक केलेला फोननंबर हा वेगळा आहे आणि ते वेगळ्याच फोनवरुन योनो अ‍ॅप्लिकेशन लॉग इन करून वापरत आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता बँकेने हा बदल केला आहे. या बदलामुळे ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून वाचवता येईल. (SBI)

 

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असल्याने एसबीआय बँकेने योनो अ‍ॅपमध्ये हे नवीन अपग्रेड केले आहे.
या बदलामुळे ग्राहकांना सुरक्षित बँकिंग अनुभव मिळेल. याशिवाय ऑनलाइन फसवणुक (Online Cheating) टाळता येणार आहे.
तसेच ग्राहकांच्या खात्याची सुरक्षाही वाढणार आहे.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे या अपग्रेडेशनमुळे ग्राहकांचा पासवर्ड आणि बँक डिटेल जरी सायबर गुन्हेगारांनी मिळवली
तरी ते इतर कोणत्याही फोन किंवा डिव्हीईसमध्ये तुमचे अकाउंट उघडून पैसे काढून शकणार नाहीत.

 

Web Title :- SBI | sbi bank rules change if you are using yono aap for online banking transaction then you should know these because it affect your transaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘…तर तुम्हीही आमच्या कानात’

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?