10 डिसेंबरपासून सुरू होतोय SBI ‘फेस्टीवल’ ! मिळणार 50 % पर्यंत सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. 10 डिसेंबर पासून देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या एका फेस्टीव्हलची सुरुवात होणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये तुम्ही बाजारातील किंमतींपेक्षा खूप कमी किंमतीत शॉपिंग करू शकता. SBIनं आपलं डिजिटल अ‍ॅप YONO वर शॉपिंग फेस्टीव्हल लाँच करण्याची घोषणा केली आहे.

10 डिसेंबर रोजी सुरू होणारा हा फेस्टीव्हल 14 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. 5 दिवसांच्या या ऑनलाइन सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शॉपिंग फेस्टीव्हलमध्ये योनो युजर्ससाठी विविध आयटम्सवर आणि सर्व्हीसवर 50 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर केला जात आहे. तसेच जर तुमच्याकडे एसबीआयचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के वेगळा कॅशबॅक मिळणार आहे.

परंतु या कॅशबॅकसाठी तुम्हाला किमान 1000 रुपयांचं ट्रँजॅक्शन करणं अनिवार्य आहे. तुम्हाला 2500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. हे एसबीय फेस्टीव्हलचं दुसरं एडिशन आहे. तुम्ही 14 डिसेंबर पर्यंत एसबीआयच्या या फेस्टीव्हलचा लाभ घेऊ शकता.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like