आता मोबाइल फोन सांगणार तुम्हाला ‘कोरोना’ आहे किंवा नाही, लक्षणे नसलेल्या रूग्णांची ओळख होणार सोपी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शास्त्रज्ञांनी एक असे आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय) मॉडल विकसित केले आहे ज्यामध्ये लक्षणे नसलेला कोविड रूग्ण सुद्धा ओळखण्याची क्षमता आहे. शास्त्रज्ञांनुसार, हे एआय एखाद्या व्यक्तीच्या खोकल्याचा आवाज रेकॉर्ड करून सांगते की व्यक्ती निरोगी आहे किंवा त्यास कोरोनाचा संसर्ग आहे. वैशिष्ट्य म्हणजे या टेस्टचे परिणाम स्मार्टफोनवर एका अ‍ॅपद्वारे पहाता येतात.

अमेरिकेच्या मेसाच्यूसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांना आढळले की, जे लोक कोरोना संक्रमित असतात, त्यांचा खोकला अन्य निरोगी व्यक्तीपेक्षा वेगळा असतो. हे अंतर खुपच अस्पष्ट असते आणि व्यक्ती सहज ऐकून ते ओळखू शकत नाही. मात्र, एआयच्या मदतीने हे अंतर ओळखले जाऊ शकते.

आयईईई जर्नल ऑफ इंजिनियरिंग इन मेडिसिन अँड बायोलॉजीमध्ये प्रकाशित एका शोधात टीमने या एआय मॉडलबाबत सविस्तर सांगितले आहे. संशोधकांनुसार खोकल्याचे रेकॉर्ड अनेक लोकांनी स्वेच्छेने वेब ब्राऊजर आणि सेलफोन किंवा लॅपटॉपद्वारे जमा केले होते.

संशोधकांनी खोकल्याचे हजारो नमूणे तसेच सोबत बोललेले शब्दांद्वारे विशेष एआय मॉडल विकसित केले आहे. संशोधकांनुसार हे विकसित केल्यानंतर जेव्हा टेस्टसाठी पडताळणी करण्यात आली तेव्हा या एआयने 98.5 टक्केपर्यंत खोकल्यांचा आवाज योग्यप्रकारे ओळखला ज्यांना कोविड – 19 चा संसर्ग झाल्याचे अगोदरच स्पष्ट झाले होते. यामध्ये 100 टक्के अशा खोकल्यांची योग्य ओळख होती ज्यांना कोरोना तर होता, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती.

एआयसाठी एक अ‍ॅप विकसित करण्याचा प्रयत्न
आता टीम या एआय मॉडलला सहजपणे वापरण्यासाठी एक अ‍ॅप विकसित करत आहे. संशोधकांनुसार जर यामध्ये यश आले तर करोडो लोकांना मोठा दिलासा मिळेल. टेस्ट सहज करता येतील आणि मोफत सुद्धा होऊ शकतात.