शास्त्रज्ञांना जमिनीच्या आत सापडले 600 मैल मोठं ‘स्ट्रक्चर’, हेच आहे का भूकंपाचे कारण !

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांना जमिनीच्या खाली 16 किलोमीटर आत एक असे स्ट्रक्चर सापडले आहे जे 600 मैल मोठे आहे आणि ते कसे अस्तित्वात आले याची काहीही माहिती नाही. यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या जियोलॉजिस्टची एका टीमने पृथ्वीच्या पोटात असलेले एक खुप मोठे आणि अजब स्ट्रक्चर शोधून काढले आहे. हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या खुपच जवळ आहे. आता शास्त्रज्ञ जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

डेली स्टारने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मेरीलँड युनीव्हर्सिटीच्या या टीमचे लीडर डोएयोन किम यांनी सांगितले की, हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या आत सुमारे 16 किलोमीटर खाली मार्केसस आयलँडपासून साऊथ पॅसेफिक ओशियनपर्यंत पसरलेले आहे. किम यांनी सांगितले की, हे स्ट्रक्चर जेथे सापडले आहे त्यास अल्ट्रा लो वेलोसिटी झोन (युएलव्हीझेड) सुद्धा म्हटले जाते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे सुमारे 620 मैलमध्ये पसरलेले आहे. अशाप्रकारचेच एक स्ट्रक्चर हवाई बेटाच्या अगदी खालीसुद्धा आहे.

आपण नाही जाणून शकत पृथ्वीला!

किम यांनी सांगितले की, आपण पृथ्वीला एवढेही जाणत नाही जेवढे आपण चंद्राच्या पृष्ठभागाला जाणले आहे. आपण पृथ्वीच्या बाहेरील पृष्ठभागाशिवाय तिच्या आतील पृष्ठभागांबाबत कोणतीही महिती मिळवलेली नाही आणि हे अशामुळे आहे की, कुणीही पृथ्वीच्या मॅग्नेट कोरशी छेडछाड करू इच्छित नाही. मानव अजून तिला व्यवस्थित समजू शकलेला नाही, यासाठी पूर्ण सावधानी बाळगली जाते. किम यांच्या माहितीनुसार आपण पहिल्या जागतिक महायुद्धानंतर आपल्याला हे समजले की, पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट घसरल्याने भूकंप येतो.

किम यांच्यानुसार या स्ट्रक्चरचा संबंध चंद्राच्या जन्माशी असू शकतो. पृथ्वीवर एक अजस्त्र मोठी वस्तू आदळल्याने 4 बिलियन वर्षांपूर्वी चंद्राचा जन्म झाला होता. किम यांची टीम आता हे मोठे स्ट्रक्चर आणि लागोपाठ येत असलेल्या भूकंपामध्ये काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

किम यांच्या टीमने 1990 पासून 2018 पर्यंत आलेल्या सर्व भूकंपांचा डेटा या स्ट्रक्चरमधून निर्माण होत असलेल्या लो वेलोसिटी तरंगांच्या आधारावर मोजण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा पृथ्वीच्या सर्वात जुन्या भागांपैकी एक भाग आहे. या भागाच्या अभ्यासातून हे समजू शकते की, आपण कोठून आलो आणि पृथ्वी कशी तयार झाली.