‘कोरोना’ची दुसरी लाट ! ब्रिटन पुन्हा महिन्याभरासाठी Lockdown

लंडन: पोलीसनामा ऑनलाईन – युरोपसह जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असून ब्रिटननेही गुरुवारपासून महिन्याभरासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये रोज २० हजार नवे असून कोरोना बाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. फ्रांस जर्मनीसह काही देशांनी यापूर्वीच लॉकडाऊन अमलात आणला आहे.

दुसऱ्या लाटेत ४४ देशांमध्ये काही दिवसांपूर्वी २ लाखाहुन अधिक रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीषण संकट ओढवणार असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

ब्रिटनमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ हजार आहे. ती दुसऱ्या लाटेत ८० अधिक होऊ शकते असा इशारा शस्त्रद्यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शाळा, विद्यापीठे सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पब, रेस्टोरंट व अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.