शहराच्या सुरक्षेत वाढ, नाकाबंदी आणि बंदोबस्त आणखी तीव्र – पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारत पाकिस्तानच्या सीमेवरील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. लष्कराच्या दृष्टीने पुणे शहर महत्त्वाचे आहे. शहरातील महत्त्वाच्या संरक्षण संस्था शत्रुच्या निशाण्यावर असतात. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून शहरातील बंदोबस्तात वाढ करत सर्व महत्त्वाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकाना एखादी वस्तू संशयास्पद वाटल्यास तिला हात न लावता तातडीने पोलिसांना याची माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.

शहरात लष्कर, हवाई दल आणि अन्य महत्वाच्या संरक्षणविषयक संशोधन संस्था पुण्यात आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालयदेखील शहरात आहे. ही सर्व ठिकाणं नेहमी शत्रुच्या निशाण्यावर असतात. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर लष्कराला अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळ, अन्य लष्करी संस्थांकडून सुरक्षेत वाढ केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांची पडताळणी पोलीस ठाण्यांच्या पातळ्यांवर करण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर

पुणे पोलिसांनी लष्कर, हवाई दल आणि अन्य महत्वाच्या संस्थांशी समन्वय साधला आहे. या संस्थांना योग्य ती मदत पुरविण्यात येत आहे. शहरातील बंदोबस्तात नेहमीपेतक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहने तपासणी करण्यात येत आहे. तर शहरात कुठेही संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित पुढील क्रमांकांवर द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस नियंत्रण कक्ष : ०२० – २६१२६२९६, १००

व्हॉटसअप नं : ८९७५२८३१००