सराईत चाेरट्यांकडून १५ दुचाकीसह, आठ मोबाईल, लॅपटॉप जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी पोलिसांनी सराईत वाहन चोरटे आणि मोबाईल चोरट्यांना अटक करुन १५ दुचाकी, आठ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. तर एका गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण सात लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d91bcd0f-a1f4-11e8-8973-513c458ae2f8′]

पिंपरी तपास पथकातील पोलीस कर्मचारी रोहित पिंजरकर यांना एका वाहन चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून निलेश मनोहर गायकवाड (२८, रा.विद्यानगर, चिंचवड) याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी करुन चोरीच्या दोन लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर शंकर मधुकर पवार (१९, रा. निराधारनगर, पिंपरी) आणि समीर शेख (२४, रा. उरळी कांचन) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. अधिक चौकशी केली असता मोबाईल, लॅपटॉप चोरी केल्याचेही उघडकीस आले. पोलिसांनी या दोघांकडून आठ दुचाकी, आठ मोबाईल संच आणि एक लॅपटॉप असा एकूण चार लाख ४२ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस शिपाई उमेश वानखेडे यांना मिळालेल्या माहितीनुसार विकास दिलीप कांबळे (२६, रा. पत्राशेड, पिंपरी, नागेश्वर कॉलनी, चाकण, मोशी रस्ता) याला अटक केली तर त्याच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले. या दोघांकडून ७६ हजार १५० रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df2e3696-a1f4-11e8-b8b7-c1f443c06e31′]

ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, वरीष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने केली आहे.