युतीची घोषणा : सेना भाजप विधासभेला लढणार ५०-५०

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची बोलणी बरेच दिवस आडून राहिली होती. त्यावर अंतिम निकाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने दिला आहे. भाजप आणि शिवसेना येत्या विधान सभेला ५०-५० जागांवर लढणार आहेत. मात्र या जागा दोन्ही पक्षा व्यतिरिक्त मित्र पक्षांशी उचित जागावाटप करू. त्यातून ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागा ५०-५० वाटून घेवू असे मुख्यमंत्र्यांनी म्हणले आहेत.

सेना भाजप युतीच्या घोषणेसाठी ब्यू सी हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभे बाबत हि घोषणा केली. त्यापूर्वी शिवसेना जनतेच्या प्रश्नावर आग्रही होती. ते प्रश्न आम्ही सोडवणार आहोत असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. महत्वाचे प्रश्न म्हणून नाणार प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होती. मात्र भाजपने मुख्यमंत्री पद शिवसेनेला सोडण्यास ठाम नकार दिला. तर भाजपने याबाबत पत्रकार परिषदेत कसलेही शक्यता वर्तवली नाही. तसेच विधानसभा निवडणुका सोबत घेण्याच्या मुद्द्याला आता पूर्णविराम मिळाला आहे असे चित्र आजच्या युतीच्या घोषणेतून दिसले आहे.