Mumbai News : वरळीत हात, पाय, तोंड दाबून ज्येष्ठ महिलेचा खुन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील वरळीतील पॉश भागात एका घरात महिलेचे हात, पाय व तोंड दाबून तिचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या घरताील नोकर फरार झाले आहेत.
विषणी दौलवाणी (वय ७८) असे खुन करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री हा प्रकार समोर आला असून या घटनेने परिसर हादरुन गेला आहे. ही महिला एकटी होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा दौलवाणी यांचे हात, पाय दोरीने बांधलेले होते. तोंडात बोळा कोंबलेला होता. पोलिसांनी तातडीने त्यांची सुटका करुन त्यांना नायर रुग्णालयात नेले.

परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. विषणी दौलवाणी यांच्या घरातील सर्व दागदागिणे गायब झाले आहे. त्यांच्या घरी असलेला नोकरही आढळून आला नाही. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने नोकरांनीच त्यांचा खुन करुन दागिने चोरुन नेल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी खुन आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.