२ हजार रुपयांची लाच घेताना बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कन्स्ट्रक्शन सुपरवायजर चे प्रमाणपत्राची फाईल तयार करून त्यावर वरिष्ठांची सही घेऊन देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

निर्मला पुंडलिक राठोड (वय ४७ पद – वरीष्ठ सहायक, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर. (वर्ग ३) ) असे पकडलेल्या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी कन्स्ट्रक्शन सुपरवायजरचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात अर्ज केला होता. त्यावेळी वरिष्ठ लिपीक निर्मला राठोड यांनी त्यांच्याकडे अडीच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती २ हजार रुपये मागितले. तक्रारदार यांनी याप्रकरणी अँटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाने त्याची पडताळणी करून शुक्रवारी सापळा रचला. दरम्यान उपअभियंता कार्यालयात लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.