दशकातील सर्वात ‘बेकार’ आठवडा, सेंसेक्समध्ये ‘भूकुंप’, 11 लाख कोटी रूपये बुडाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या अनागोंदी कारभारामुळे भारतीय शेअर बाजारासाठी मागील व्यापार आठवडा गेल्या दशकातील सर्वात खराब आठवडा ठरला आहे. परकीय बाजाराकडून निराशाजनक संकेत मिळाल्यामुळे देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 11 लाख कोटी रुपये बुडाले. मागील आठवड्याच्या तुलनेत सेन्सेक्स सात टक्क्यांनी घसरला तर निफ्टी सात टक्क्यांहून अधिक कमी झाला. मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स शुक्रवारी मागील आठवड्याच्या तुलनेत 2,872.83 अंक म्हणजे 6.98 टक्क्यांनी घसरत 38,297.29 वर बंद झाला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे 50 शेअर्सवर आधारित संवेदनशील निर्देशांक निफ्टी 879.10 अंक म्हणजेच 7.27 टक्क्यांनी घसरून 11,201.75 वर बंद झाला. तसेच बीएसई-मिड-कॅप निर्देशांक मागील आठवड्याच्या बंदच्या तुलनेत 1,094.39 अंकांनी म्हणजेच 6.97 टक्क्यांनी घसरून 14,600.02 वर बंद झाला तर स्मॉल-कॅप निर्देशांक 1,037.51 अंक म्हणजेच 7.03 टक्क्यांनी घसरून 13,709.01 वर बंद झाला. तसेच देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात कमकुवत झाली. सोमवारी सेन्सेक्स मागील सत्राच्या तुलनेत 806.89 अंक म्हणजेच 1.96 टक्क्यांनी घसरुन 40,363.23 वर बंद झाला आणि निफ्टीदेखील 242.25 अंक म्हणजेच 2.01 टक्क्यांनी घसरून 11,838.60 वर बंद झाला.

मंगळवारी सलग तिसर्‍या सत्रातदेखील ही घसरण सुरूच राहिली. सेन्सेक्स मागील सत्रच्या तुलनेत 82.03 अंक म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 40,281.20 वर बंद झाला आणि निफ्टी 16.20 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 11,813.20 वर बंद झाला. बुधवारी कोरोनाव्हायरसमुळे बाजारातील मंदी कायम राहिली तेव्हा सेन्सेक्स 392.24 अंक म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 39,888.96 वर बंद झाला आणि निफ्टी 119.40 अंक म्हणजेच 1.01 टक्क्यांचा घसरणीसह 11,678.50 वर बंद झाला. व्यापार आठवड्याच्या चौथ्या सत्रात सेन्सेक्स 143.30 अंक म्हणजेच 0.36 टक्क्यांनी खाली घसरून 39,745.66 वर बंद झाला आणि निफ्टी 45.20 अंक किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 11,633.30 वर बंद झाला.

शुक्रवारी व्यापार बाजाराच्या अखेरच्या सत्रात परकीय बाजाराकडून आलेल्या निराशाजनक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली, सेन्सेक्स मागील सत्राच्या तुलनेत 1,448.37 अंक म्हणजेच 3.64 टक्क्यांनी घसरून 38,297.29 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 431.55 अंकांनी म्हणेजच 3.71 टक्क्यांनी घसरून 11,201.75 वर बंद झाला.