Sensex कोसळला, Nifty घसरला, Bajaj Auto मध्ये 6% ची मोठी घसरण, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या सत्रात सोमवारी शेयर बाजारात जबरदस्त घसरण दिसून आली. जबरदस्त नफा वसूलीमुळे बीएसई सेन्सेक्स 540 अंक म्हणजे 1.33 टक्के घसरून 40145.50 अंकाच्या स्तरावर राहीला. तर, निफ्टी 162.60 अंक म्हणजे 1.36% घसरून 11,767.80 अंकाच्या स्तरावर राहीला. सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाणासह बंद झाले. निफ्टी ऑटो आणि मेटल तीन-तीन टक्के घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर बजाज ऑटोच्या शेयरमध्ये सर्वात जास्त 6.10 ची घसरण दिसून आली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्राचे शेयर 4.53 टक्के, रिलायन्सचे शेयर 3.97 टक्के आणि टाटा स्टीलचे शेयर 3.60 टक्केपर्यंत घसरले.

याशिवाय टेक महिंद्रा, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, टायटन, आयटीसी, ओएनजीसी, इन्फोसिस, बजाज फायनान्स, मारुती, अल्ट्राटेक सीमेंट, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि भारती एयरटेलचे शेयर लाल निशाणासह बंद झाले.

दुसरीकडे नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, इन्डसइन्ड बँक, पॉवरग्रिड, हिन्दुस्तान युनिलीव्हर लिमिटेड, लार्सन अँड टूब्रो, एचडीएफसी आणि टीसीएसचे शेयर हिरव्या निशाणीसह बंद झाले.

आनंद राठीमध्ये प्रमुख इक्विटी रिसर्च (फंडामेंटल) नरेंद्र सोलंकी यांनी म्हटले की, युरोपमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ आणि काही देशांनी लॉकडाऊनसंबंधी प्रतिबंध पुन्हा लागू करण्याचा विचार केल्याने तसेच देशातील अन्य कारणांसह मिळत्या-जुळत्या संकेतांनंतर भारतीय बाजार संथपणे उघडला. दुपारच्या सत्रात धातु, ऑटो, रियल्टी आणि फायनान्शियल स्टॉकमध्ये विक्रीसह बाजारात कमजोर ट्रेडिंग जारी होती.

जागतिक दृृष्ट्या विचार केल्यास शांघाय, टोकीयो आणि सिओलमध्ये शेयर बाजार लाल निशाणीसह बंद झाला. तर युरोपीय शेयर बाजारात सुद्धा सुरूवातीच्या व्यवहारात कमजोरी दिसून आली.

परकीय चलन विनिमय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैसे कमजोर होऊन 73.84 च्या स्तरावर बंद झाला.

You might also like