पश्‍चिम महाराष्ट्रात फॉर्म हाऊसमध्ये चालणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या तरूणी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने एका फार्महाऊसवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कारवाईच्यावेळी काही तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. ही कारवाई विशेष पथकाने पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर करण्यात आली. पोलिसांनी चार तरुणी आणि दोन एजंटला अटक केली आहे.

पन्हाळा ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेवाडी येथील आर. जे. फार्महाऊसवर वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती कोल्हापूर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांच्या विशेष पथकाला समजली होती. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवत असल्याची माहिती दिल्यानंतर सापळा रचलेल्या पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काही तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी फार्महाऊसचा मालक महेश श्रीकांत कदम आणि गणेश बाळासाहेब जगदाळे यांच्यासह चार तरुणींना ताब्यात घेतले आहे. तसेच दोन टाटा सुमो, दुचाकी, मोबाईल असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींना तेजस्विनी महिला सुधारगृहात तर दोन आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंद कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ए. एस. पाटील, एम. बी. पाटील, ए. आर. पाटील, एम. एस. घोडके, जे. ए. पाटील, एस.एम. लाड यांच्या पथकाने केली.

Visit : policenama.com