home page top 1

चक्क हॉस्पिटल सेक्स रॅकेट !

भोपाळ : वृत्तसंस्था – उज्जैनमधून एका रुग्णालयात देह व्यापाराचा धंदा उघडकीस आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात हा देह व्यापार चालविला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर या रॅकेटमध्ये एका अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून बांधलेले सरकारी चरक रुग्णालयात अनेक दिवसांपासून देह व्यापाराचा  व्यवसाय सुरु होता. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यांवर सुरु असलेल्या या व्यवसायात अनेक लोकांचा समावेश होता. चरक हॉस्पिटलमध्ये सहा मजले आहेत. जेथे चरक रुग्णालयात तिसर्‍या मजल्यापर्यंत आरोग्य सेवा चालविली जाते, ज्यामध्ये चौथ्या ते सहाव्या मजले रिक्त आहेत. चरक हॉस्पिटलच्या चौथ्या ते सहाव्या मजल्यावरील हा देह विक्रीचा व्यवसाय कित्येक महिन्यांपासून चालू होता.

मिळालेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधील अनेक ठिकाणं हि निर्जन आहेत. याचाच फायदा घेत काही दलालांनी त्या ठिकाणी अनैतिक काम करायला सुरुवात केली. येथे वेश्या बोलवल्या जात होत्या आणि  ग्राहकांना बोलावून सौदा करण्यात येत होता.

याठिकाणी एसपी उज्जैन सचिन अतुलकर यांनी सांगितले की,  अशा अनेक तक्रारी आल्या असून त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचार्‍यांचीही चौकशी केली जात आहे. चौकशी करण्यासाठी  एसआयटीची स्थापना करण्यात आली असून त्यात मोठा खुलासा होऊ शकतो. त्याच वेळी, गर्भवती अल्पवयीन मुलीला उपचारासाठी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ही अल्पवयीन मुलगी नागझिरी पोलिस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

उज्जैन जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनीही सीएमएचओला तपासासाठी पाठवले आहे. शशांक मिश्रा म्हणाले की, चरक रुग्णालयात संशयास्पद क्रियाकलाप झाल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. जर रुग्णालयातील या प्रकरणात समावेश असलेल्या लोकांवरदेखील कारवाई केली जाईल.

त्याचवेळी या प्रकरणात सज्जनसिंग वर्मा सांगितले की, एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे लोक सामाजिक वातावरणास प्रदूषित करतात त्यांना सोडले जाऊ नये. समाजाला चांगला संदेश मिळावा यासाठी त्यांनी गृहमंत्र्यांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like