‘Dance India Dance’च्या कोरियोग्राफरवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘Dance India Dance’ या टीव्ही शोचा कोरियोग्राफर आणि बॉलिवूड कोरियोग्राफर सलमान सय्यद खानवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुंबई मधील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. ओशिवारा येथील एका कॉफी हाऊसमध्ये एका एका महिला कोरियोग्राफरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड सहिंतेचे कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस सध्या सलमानचा शोध घेत आहेत.

या आधी हि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर लैंगिक अत्याचारचे आरोप लावण्यात आले आहेत. त्याची #Metoo हि चळवळ सुरु करण्यात आली आहे. त्यात बऱ्याच दांडग्या व्यक्तिमत्वांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. याच प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. अकबर यांनी राजीमाना दिला आहे. प्रिया रमणी या महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवले होते. त्या महिलेवर अकबर यांनी अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात त्या महिलेला पोलिसांनी परवा समन्स बजावले आहे.  मागील काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमारवर लैंगिक छळ केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र काही कालावधी नंतर त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.