Shahajibapu Patil-On Ajit Pawar | शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता नसेल, पण लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार; शहाजी बापू पाटलांचे अजितदादांना प्रत्युत्तर

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Shahajibapu Patil-On Ajit Pawar | शिंदे गटातील (CM Eknath Shinde) आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) आज पुण्यातील पिंपरीत आले होते. त्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तसेच शिवसेनेवरही टीका केली. ते म्हणाले, शरद पवार साहेब काय फक्त अजित पवार यांच्या मालकीचे नाही. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे लोकनेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलावं की नाही बोलावं हे अजित पवार यांनी ठरवू नये, लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. (Shahajibapu Patil-On Ajit Pawar)

 

शहाजीबापू पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर भलेही माझी टीका करण्याची पात्रता नसेल. मात्र लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याविषयी बोलताना ते म्हणाले, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल. शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हा जवळ येत आहे. त्याप्रमाणे गाठीभेटी देखील सुरू आहेत. मंत्री पद मिळो अगर न मिळो मी शिंदे गटात राहणार, असे ते म्हणाले. (Shahajibapu Patil-On Ajit Pawar)

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, दसरा मेळाव्यात एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले तर कुणाचे भाषण प्रथम ऐकाल, यावर अजित पवार यांनी ताबडतोब उत्त देत म्हटले होते की उद्धव ठाकरे. त्यांच्या या उत्तरावर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले, अजितदादांना आता भाषणं ऐकण्याशिवाय काम राहिलेलं नाही. त्यांनी इंदोरीकरांचीही किर्तनं ऐकावीत.

दादा सध्या विरोधी पक्षनेते झालेत. त्या पदाचं काम काय दादांच्या लक्षात येईना.
कारण आयुष्य सत्तेच्या खुर्चीवर बसून गेलंय. सत्तेचा खेळ दादांना माहितीये.
हा खेळ दादांना काय माहिती नाही. दादाच्या मनात काय ते सायबाला (शरद पवार) तरी कळलंय का.
आपल्याला तरी काय कळणार. दादा एक दिवस बरोबर झटका देणार, असे भाकितही शहाजीबापू पाटील यांनी केले.

 

Web Title :- Shahajibapu Patil-On Ajit Pawar | CM eknath shinde camp shahaji bapu patil slams ncp leader ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर