मंदीराचा पैसा शिक्षणासाठी खर्च करणारे शाहु महाराज हे देशातील पहिले व शेवटचे राजा : श्रीमंत कोकाटे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन  – ज्या राज्यामध्ये आणि ज्या देशामध्ये शिक्षणावर जास्त खर्च केला जातो त्या राज्यात पोलीस प्रशासन व संरक्षणाचा खर्च कमी करावा लागतो. ब्रीटीश राजवटीत मुंबई प्रांतामध्ये ब्रीटीश सरकार जेवढा खर्च शिक्षणारवर करत होते त्याच्या दहा पट खर्च शाहुमहाराज त्यांचे संस्थानातील शिक्षणावर करत होते. त्यामुळे उच्च शिक्षीत शाहुराजांनी राज्यअभिषेक झाल्यानंतर सर्वात आधी शालेय शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेवून शाळेसाठी ८०टक्के खर्च दरबार खजिण्यातुन व २०टक्के खर्च मंदीर निधीतुन करण्याचा निर्णय घेतला. मंदीर निधीतुन शिक्षणासाठी खर्च करणारे छत्रपती शाहुमहाराज हे देशातील पहिले व शेवटचे राजे असल्याचे मत इतिहास संशोधक शिवश्री, श्रीमंत कोकाटे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

श्रीमंत कोकाटे हे राधीका हाॅल इंदापूर येथे इंदापुर विचारमंथन परिवार आयोजित राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे ९८ व्या जयंती दिन व लाॅकडाउन सांगता समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने हे उपस्थित होते. तर राधीका सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर विचार मंथन परीवाराचे सर्वेसर्वा अरविंद (तात्या) वाघ, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे, डाॅ.सुहास शेळके, मा.उपनगराध्यक्ष प्रा.कृृृृष्णाजी ताटे, मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, आरपीआय पूणे जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, माजी नगरसेवक राजेश शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेवक अविनाश मखरे,आरपीआय बारामती लोकसभाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आरपीआय तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, अॅड. विशाल चव्हाण, आरपीआय मातंग आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नितीन आरडे,राष्ट्रसेवादलाचे रमेश शिंदे इत्यादी प्रमुख
उपस्थित होते.

जातीची आणी धर्माची डोकी इतकी प्रगल्ब झालेली आहेत की माणुसच माणसाला विसरत चालला आहे.अशा काळात परिवर्तनवादी विचारमंथन सारख्या ग्रुपची समाजाला सध्या गरज आहे.राजश्री शाहु महाराजांच्या कार्याला समरस व मिळते जुळते कार्य इंदापूर विचारमंथन परीवाराचे असल्याचे श्रीमंत कोकाटे म्हणाले.ते पुढे म्हणाले की शाहू राजांच्या शिक्षणाचा खर्च एकुण बजेटच्या २३.५ टक्के इतका होता.शाहुराजांचा राज्यभिषेक झाल्यानतर त्यांचा पूण्यामध्ये सार्वजनिक सभेने सत्कार आयोजित केला होता.त्यावेळी शाहुमहाराजांचा संबध सत्यशोधक चळवळीशी आला.त्यांना सत्काराच्या वेळी महात्मा फुले लिखीत समग्र वांगमय, शेतकर्‍यांचा आसुड, गुलामगीरी, सत्यशोधक चळवळ असे वेगवेगळे ग्रंथ भेट देण्यात आले होते.त्या ग्रथांच्या वाचनातुन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य त्यांना समजल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही प्रेरणा महात्मा जोतीबा फुले यांच्या तत्वज्ञानातुन व विचारातुन शाहुराजांना मीळाल्याचे श्रीमंत कोकाटे यांनी सांगीतले.

शाळा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकच वसतीगृह सुरू असल्याने निकालानंतर राजांच्या लक्षात आले की बहुजनांची मुले या शाळेत उत्तीर्ण होणार नाहीत.म्हणजेच त्या ठीकाणचे जातीवादी वक्ते हे बहुजन समाजाच्या मुलांना पळवुन लावत होते.त्यामुळे राजांनी प्रत्येक जातीनिहाय वसतीगृृृहांची स्थापना करून देशात आनेक ठीकाणी संस्था स्थापन केल्या.शाहु महाराजांचे काम हे समाज परीवर्तनवादी कार्य होते.राजेशाहीला लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याचे एतिहासीक काम शाहु महाराजांनी केले होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व शाहुमहाराज १९२० साली मानगाव येथील परिषदेत एकत्र आले असता छत्रपती शाहु महाराजांची जयंती सनासारखी साजरी करा असे उदगार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदेत बोलताना काढले असल्याचे श्रीमंत कोकाटे यांनी सांगीतले.प्रस्ताविक शिवाजीराव मखरे यांनी केले तर सुत्रसंचलन माउली नाचन यांनी केले व आभार नगरसेवक अनिकेत वाघ व विशाल चव्हाण यांनी मानले.