संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशियन अधिकार्‍यांना दूरूनच नमस्कार, व्हिडीओ केला शेअर

पोलीसनामा ऑनलाईन, मास्को, दि. 2 सप्टेंबर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शांघाई संघटनेच्या बैठकीसाठी रशिया येथे पोहोचले आहेत. संरक्षणमंत्री बुधवारी रात्री मॉस्को येथे पोहोचले. या दरम्यानचा एक व्हिडीओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेअर केलाय. यात ते रशियाच्या अधिकार्‍यांना हात न मिळविता पारंपरिक पद्धतीने नमस्ते करताना दिसत आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करीत म्हटलंय की, आज सायंकाळी मॉस्को येथे पोहोचलो. काल रशियाचे जनरल सर्गेई शॉयगू यांच्यासह द्विपक्षीय बैठकी संदर्भात उत्साहित आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. यात मॉस्को एअरपोर्टवर रशियान अधिकारी त्यांचे स्वागत करीत असताना दिसत आहे. येथे त्यांना आणण्यासाठी मेजर जनरल बुख्तीव यूरी निकोलाइविच हे आले होते.

व्हिडीओत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह रशियात भारतीय राजदूत डीबी वेंकटेश वर्मा हे देखील आहेत. यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मास्क लावलाय. त्यांचं स्वागत केल्यानंतर रशियन आर्मीचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना सॅल्यूट करीत हात मिळविण्यासाठी आपला हात पुढे केला. मात्र, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपले हात जोडत त्यांना नमस्ते म्हटलंय. त्यांनी प्रत्येक अधिकार्‍याला अशाचप्रकारे अभिवादन केलंय.

कोरोनाच्या काळात जगभरातील नेते नमस्ते म्हणतात.
संरक्षणमंत्री येथे एससीओच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झालेत. यात दोन्ही देशांदरम्यान सुरक्षेबाबत मदत वाढविण्यासाठी रशियासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

या संघटनेत भारत, रशिया, कजाकिस्तान, चीन, किर्गिज़स्तान, पाकिस्तान, रशिया, तजिकिस्तान आणि उज़्बेकिस्तान या आठ देशांचा सहभाग आहे. या बैठकीत आठ देशातील संरक्षण मंत्री दहशतवाद आणि त्यातून देशाची सुरक्षा आणि याविरोधात एकत्रितपणे लढाई आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान गंभीर वाद सुरूय.

सध्या देशभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. अशात चीनच्या कुरापती सुरू आहेत. गलवान खोर्‍यानंतर चीनने पुन्हा भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय.