Shani Margi 2020 : 29 सप्टेंबर पासून शनी होणार सरळ मार्गस्थ, ‘या’ राशीच्या जातकांना शनिच्या प्रभावापासून मिळेल दिलासा

पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 29 सप्टेंबरला न्याय ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनी आता सरळ मार्गस्थ होत आहे. 142 दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी वक्री असलेला शनी सरळ मार्गस्थ होणार आहे. शनी मार्गस्थ झाल्याने ज्या राशींवर शनिचा प्रभाव होता, तो खुप कमी होईल. शनी 11 मे 2020 ला वक्री झाला होता. यापूर्वी 24 जानेवारीला शनीने धनु राशीतून मकर राशीत गोचर केले होते.

शनीचे मार्गस्थ होणे ही एक मोठी घटना आहे. शनी मार्गस्थ झाल्याने मिथुन, कन्या, कर्क, धनु आणि वृश्चिक राशिच्या जातकांना फायदा होईल. शनी अडीच वर्षात एका राशीतून दुसर्‍या राशीत जातो. यामुळेच शनीची साडेसाती आणि साडेसातीचा पाया म्हणजेच टप्पा सुरू होतो.

शनीच्या या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीवाल्यांवर शनी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, तर धनु आणि मकर राशीत अगोदरच शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होता, तो सुद्धा या वर्षाच्या अखेरपर्यंत समाप्त होईल.

शनी व्रकी झाल्याने ज्यांना साडेसातीचा पाया, साडेसाती होती, त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले होते, आता शनी या लोकांना दिलासा देईल. मेष राशीवाल्यांना दिलासा मिळेल. या राशीला अष्टमचा पाया होता, जो आता समाप्त होईल. मिथुन राशीवाले कौटुंंबिक समस्यांमध्ये अडकू शकतात.

धनु राशीच्या जातकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता दिसून येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रभाव कमी होईल. मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना शनीची साडेसाती सुरू होईल. कुंडली पाहूनच व्यक्तीगत प्रकारे जातकाबाबत शनीचा शुभ-अशुभ प्रभाव सांगितला जाऊ शकतो.