अक्षरा सिंहच्या ‘प्रायव्हेट रोमँस’ची सोशलवर ‘चर्चा’, होळी साँग व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – यावेळीची भोजपुरी साँगच्या तडक्यामुळं होळीचा आनंद दुप्पट होणार आहे असं दिसत आहे. भोजपुरी सेंसेशन अक्षरा सिंह हिनं नुकतंच आपलं होळीचं गाणं रिलीज केलं आहे. अक्षय सिंहनं स्वत: तिच्या युट्युबवरून शेअर केलं आहे. कालच तिनं या गाण्याच्या रिलीजबद्दल इंस्टावरून माहिती दिली होती. अखेर हे गाणं आता रिलीज झालं आहे. सध्या अक्षराचं हे होळी साँग सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रायवेट रोमँस असं अक्षराच्या होळी साँगचं नाव आहे. व्हिडीओ साँगमध्ये अक्षरा ग्रीन टॉप आणि ब्लू जिन्समध्ये दिसत आहे. अक्षराचा हा लुक तिला सूट करत आहे. कारण यातही ती खूप सुंदर दिसत आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर संतोष पुरीनं हे गाणं लिहिलं असून अक्षरा सिंहनं हे गाणं गायलं आहे. म्युझिक मधुकर आनंदचं आहे. सध्या हे गाणं खूप व्हायरल होताना दिसत आहे. चाहते तर वारंवार हे गाणं पहात आहेत. काही तासांतच या व्हिडीओ साँगनं लाखो व्ह्युज घेतले आहेत. गाण्यांसोबतच व्हिडीओच्या कमेंटमध्ये अक्षराच्या लुकची आणि अॅक्टींगची स्तुती होताना दिसत आहे.