शरद पवार भेटल्यानंतर ‘या’ गोष्टींचं ‘कौतुक’ करतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी संसदेत शरद पवार भेटल्यानंतर माझ्या कपड्यांचे कौतूक करतात असे सांगितले. या कार्यक्रमासाठी रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अपंगांना दिव्यांगजन हा पर्यायी शब्द दिला आहे. दिव्यांगजनांचे नोकरीतील आरक्षण चार टक्के करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य आणि केंद्र सरकारमधील दिव्यांगजनांचा अनुशेष भरून काढण्याचा आपला प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात हेमंत टकले उपस्थित होते.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, दृष्टीहीन आणि विविध दिव्यांगजनांसाठी मागील पाच वर्षात केंद्र सरकारने आठ हजार एडीप कॅम्प लावले. यामध्ये 13 लाख 54 हजार दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली.

हेमंत टकले यांच्याविषयी बोलताना आठवले म्हणाले, त्यांचा पक्षाशी आमची युती नाही. पक्षाची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मैत्री कायम जपण्याचे काम टकले यांनी केले असून त्यांच्या आग्रहावरूनच आपण या कार्यक्रमात आलो असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संसदेत मला भेटल्यावर माझ्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी नॅब संस्थेतर्फे रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –