Nilesh Rane | संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का ?

पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ड्रावरमधून 54 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी केला आहे. पाटलांच्या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) उत्तर दिले आहे. एखाद्याने शरद पवारां (Sharad Pawar) च्या ड्रॉवरमधून पत्र चोरल असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करण अन् चोरीचा माल विकत घेण हा फार मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरताना त्या काळोख्या खोलीत टार्चच्या प्रकाश मारण्यासाठी अजितदादासोबत भाजपाचे कोण कोण होते? याचाही खुलासा करावा असेही शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केली आहे. यावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane) यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायच आहे का, असे राणे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायच होतं का ? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे.
संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये.
अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला.
अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरल पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का ?
दुसर म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटमधून केली आहे.

काय म्हटलं होत चंद्रकांत पाटलांनी ?
महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवारांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती.
कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला.
आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार.
कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. 14 महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून 54 आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात, अशी टीका पाटलांनी केली होती.

हे देखील वाचा

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

ट्विटर ला देखील फॉलो करा