CM ‘रेवडी’ पैलवान, आम्ही रेवडी ‘पैलवाना’ शी कुस्ती नाही खेळत : शरद पवार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीरमध्ये जाऊन शेती कोण करणार असा प्रश्न शरद पवार यांनी जाहीर सभेत विचारला. त्यावेळी उपस्थितांनी इथली शेती परवडत नाही तिथं कोण मरायला शेती करायला जाणार असे उत्तर दिले. धनंजय मुंडे यांच्या आंबेजोगाई येथील प्रचार सभेमध्ये कलम 370 वरून मोदी सरकारचा समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना मुख्यमंत्री हे रेवडी पैलवान असून रेवड्यांवरची कुस्ती आम्ही खेळत नसल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.

भाजपचे नते प्रत्येक सभेत कलम 370 बाबात सांगतात. मूलभूत प्रश्न बाजूला आहेत. शेतकरी, बेरोजगारी, उद्योग बंद पाडले आणि सांगतात 370 चा निर्णय म्हणे, 56 इंच छातीने घेतला ते कोण निर्णय घेणारे हा निर्णय पार्लमेंटने घेतला असे सांगत शरद पवार यांनी कलम 370 चा समाचार घेतला. सध्या महाराष्ट्रात परळीची चर्चा असून परळीची जागा जिंकून देण्याचे आवाहन करण्यासाठी पंतप्रधान मोदी परळीत आले. या ठिकाणची जागा जिंकायची तर पंतप्रधानांशिवाय पर्याय नाही. या निर्णयापर्यंत भाजप आली असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला खात्री आहे परळीची बहाद्दर जनता धनंजय मुंडेला निवडून देईल. कारण सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शहा, मोदी, योगी यांच्यावर निशाणा साधला. हे सर्व नेते परळीत आले. मात्र, परळीत आल्यानंतर त्यांनी पवारांनी काय केले, माझं नाव घेतल्याशिवाय यांची सभा पूर्ण होत नाही. हे झोपेत ही माझे नाव घेत असतील असा टोला लगावला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी