नरेंद्र मोदी माझ्याबाबत सोयीस्कर भूमिका घेतात : शरद पवार 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन
आज शरद पवारांनी कोल्हापुरातील दसरा चौकात जाऊन मराठा आंदोलनात सहभाग घेतला. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण द्यायचे असल्यास घटना दुरूस्ती गरजेची आहे. त्यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी, घटना दुरूस्ती बाबत मी विरोधकांशी बोलेन असे शरद पवार म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याबाबत सोयीस्कर भूमिका घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी शरद पवारांना घरी बसवा अशी टीका केली होती. मात्र जेव्हा ते पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा पवारांचे बोट धरून मी चालायला शिकलो असे वक्तव्य मोदींनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माझ्याबाबतची भूमिका सोयीस्कर आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
[amazon_link asins=’B073X1X983′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d25b777-9252-11e8-9e58-658cc7a2798e’]

मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना विरोध नाही

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ब्राम्हण व्यक्ती असल्याच्या रागातून आंदोलन तापवले आहे का असे विचारताच  पवारांनी त्याचा इन्कार केला.राज्याचे पहिले मुख्यमंत्री खेर हे ब्राम्हण होते.नंतरही या राज्यात ब्राम्हण मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ब्राम्हण असण्याचा आकस नाही.त्या कारणाने आंदोलन होत नाही. मराठा,धनगर अशा आरक्षण प्रश्नाचे सरकारला गांभीर्य नाही.सरकारकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा राग अधिक आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.