Sharad Pawar | शरद पवारांचा सेनेच्या बंडखोरांना माघारी फिरण्याचा इशारा; दिलं छगन भुजबळांचं उदाहरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलंय. मी याआधी अनेक राजकीय बंड पाहिलेली आहेत. कारण जेव्हा नेता बंड करतो, त्यावेळी कार्यकर्ते त्याच्यामागे जात नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जेव्हा शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्याबरोबर 11 ते 15 आमदार होते. त्यानंतर निवडणुका झाल्या. एकटे सोडले तर बाकीचे सगळे पराभूत झाले. त्यामुळे शिंदे यांच्याबरोबरच्या बंडखोरांबाबतीत ही स्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकप्रकारे बंडखोरांना माघारी फिरण्याचा इशाराच दिला आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar)  बोलत होते.

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांना राजकीय उपदेश देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळ यांच्या बंडाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, मला आठवतंय ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये (Congress) आले. त्यावेळी त्यांच्यासोबत 12-16 आमदार होते. त्यानंतर निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत एकटे सोडले तर बाकी सगळ्यांचा पराभव झाला होता. हा पूर्वीचा अनुभव महाराष्ट्राला आहे. ही स्थिती आताच्या बंडखोरांबाबतीत येऊ शकते, हे नाकारता येत नाही.

आमदारांना राज्यात यावेच लागेल
शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटल नाही
की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील.
तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे.
त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
तसेच त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल असा इशारा शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar give example to eknath shinde rebel mla group over chhagan bhujbal stands against shivsena 1991

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC च्या शेयरमध्ये का टिकत नाही तेजी, जाणून घ्या JP Morgan ने अनालिसिसमध्ये काय म्हटले

 

Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपाच ! ‘महाविकास’ सरकारसाठी 24 तास महत्वाचे, शरद पवाराचे मोठं वक्तव्य

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका