Sharad Pawar | शरद पवारांनी सांगितलं पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाचं ‘राज’कारण; म्हणाले –

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sharad Pawar | देशभर आज पाच राज्यांच्या निवडणुकीच्या (Election Result) निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आतापर्यंत लागलेल्या निकालांनुसार पंजाब (Punjab) सोडता इतर चार राज्यात भाजप (BJP) पुन्हा सत्तेवर येणार असल्याचं दिसत आहे. एकमेव राज्य रााहिलं ते पंजाब, पंजाबमध्ये आधी सत्ता असलेल्या काँग्रेसलाही (Congress) सत्ता राखता आली नाही. तिथे आम आदमी पक्षाने (AAP) मुसंडी मारली आहे. या सर्व निकालांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

पंजाबमध्ये जे चित्र पाहायला मिळत आहे ते भाजपला अनुकुल असून काँग्रेसला झटका देणारं आहे. आम आदमीने दिल्लीत (Dehli) केलेल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पंजाब सोडलं तर बाकी राज्यात ज्यांची आधी सत्ता होती त्यांनाच समर्थन देण्याची भूमिका तेथील जनतेने घेतली आहे. त्यामुळे भाजप राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 

पंजाबमधील काँग्रेसच्या पराभवाचं कारण –

पंजाबमध्ये काँग्रेसची एकेकाळी चांगली स्थिती होती. मात्र पक्षांतर्गत जे निर्णय घेतले गेले ते पंजाबच्या जनतेला पटले नाहीत.
अमरिंदर सिंह यांचं नेतृत्त्वात सरकार असताना त्यांना पदावरून हटवत नवीन नवं नेतृत्त्व आलं.
अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी बाहेर पडत नवीन पक्ष उभारत ज्या लोकांची देशात सत्ता आहे त्यांच्यासोबत नातं ठेवण्याचा निर्णय घेतला.
हाही निर्णय पंजाबमधील जनतेला पटला नाही.
त्यासोबतच कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमधील आंदोलन चालू होतं त्यामध्ये पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात होते.
त्यामुळे त्यांच्या मनात जो राग होता तो या निवडणुकीत दिसून आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, पंजाबमधील लोकांनी भाजप आणि काँग्रेसला हरवलं आणि सत्ता एका नवीन पक्षाच्या हातात दिली.
केजरीवालांचं (Arvind Kejriwal) दिल्लीत जे सरकार आहे या सरकारची दिल्लीतील सामान्य माणसांची मत जाणून घेतली तर आम आदमीच्या बाजूची असतात, असं शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar said people vote aap this is big jolt for congress punjab assembly election result 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा