Sharad Pawar | शरद पवारांना ‘यूपीए’ अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sharad Pawar | मागील काही दिवसापूर्वी केंद्रातील सत्ताधारी भाजप (BJP) विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत बैठक घेतली होती. भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. अशातच आज झालेल्या राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची (Nationalist National Youth Congress Executive) बैठकीत एक मोठा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ म्हणजेच यूपीए अध्यक्ष (UPA President) करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे समजते.

 

दिल्ली (Delhi) येथे आज राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडते. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या बैठकीत उपस्थित आहेत. शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आहे. शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रस्ताव मांडण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

आगामी काळात भाजपला रोखण्यासाठी ही तयारी असल्याचे समजते.
त्यामुळे यासाठी शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
दरम्यान, या प्रस्तावाबाबत शरद पवार यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. दरम्यान याबाबत शरद पवार कोणती प्रतिक्रिया देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | NCP Chief sharad pawar to make the president of upa proposal in national executive meeting of ncp youth congress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा