Sharad Pawar On PM Narendra Modi | सत्तेच्या उन्मादात विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही संपविण्याचे काम सुरू लोकशाही विरोधी सरकार उलथवून टाकण्याचे शरद पवार यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथनी आणि करनीमध्ये फरक – शरद पवार

पुणे : Sharad Pawar On PM Narendra Modi | केंद्रामध्ये दहावर्षांपुर्वी सत्तेत येण्याअगोदर रोजगार, महागाई, शेतीबाबत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये फरक असल्याचे जनतेला समजून चुकले आहे. केवळ सत्तेचा उन्माद करून विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. अशा सत्तेला उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इंडिया आघाडीच्या (INDIA Aghadi) उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule (बारामती- Baramati Lok Sabha), डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe (शिरूर – Shirur Lok Sabha) आणि रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar (पुणे – Pune Lok Sabha) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर रास्ता पेठेत सभा झाली. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सचिन आहीर (Sachin Ahir), खासदार ऍड. वंदना चव्हाण (Adv Vandana Chavan), डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) , सुषमा अंधारे (Sushma Andhare), रोहिणी खडसे (Rohini Khadse), अजित फाटक, आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भाजपने दहा वर्षाच्या सत्तेत जनतेची फसवणूक केली. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. पन्नास दिवसांत पेट्रोलचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करतो. गॅस सिलेंडरचे दर कमी करतो. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार अशी आश्‍वासन दिली होती. दहा वर्षांनंतर पेट्रोलचे दर कमी होणे तर दूरच ७१ रुपयांचे पेट्रोल १०६ रुपयांवर पोहोचले. ४१० रुपयांचा गॅस १ हजार ६१ रुपयांवर पोहोचला. दोन कोटी रोजगार तर दूर तब्बल ८६ टक्के तरुण बेरोजगार झाला आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या प्रश्‍नांसाठी दिल्लीत आंदोलन करावी लागत आहेत. त्यांच्यावरही लाठीहल्ले केले जात आहे. खेळांडूच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे आपणच दिलेल्या आश्‍वासनांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीत विरोधकांना कारागृहात डांबून लोकशाही नष्ट करण्याचा सत्तेतून आलेला उन्माद सुरू आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर टीका केली म्हणून त्यांना कारागृहात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या चार मंत्र्यांना कारागृहात टाकले. पश्‍चिम बंगालमध्येही तृणमृलच्या मंत्र्यांना कारागृहात टाकले आहे. सत्ता लोकशाही जगवण्यासाठी असते ती मिटवण्याचे काम सुरू आहे. लोकशाही जगवण्यासाठी ही सत्ता उलथवण्यासाठी लोकांनी महाविकास आघडीला मतदान करावे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विकसित देशाची व्याख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत नाहीत. सध्याच्या विकास दरानुसार अभ्यास केला तर २०४७ पर्यंत देश विकसित होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जाहीरनाम्यात तब्बल ४८ वेळा मोदींचा फोटो वापरला आहे. लोक त्यांना विसरू नयेत यासाठी हे फोटो छापले आहेत. शरद पवारांनी निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र काम करत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निश्‍चित असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. पुण्यात उमेदवार निवडताना सर्वांकडूनच रवींद्र धंगेकर यांचे नाव येत होते. सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी कसबा निवडणुकीत याच बळावर विजय मिळविला. पुणेकर त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवतील, असा विश्‍वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, ही निडवणूक देशासाठी महत्वाची आहे. तीन उमेदवारांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. डॉ. कोल्हे हे नुसते कलाकार नसून तत्वांसोबत राहिलेला उमदा उमेदवार आहे. आम्ही लोकसभेसाठी उमेदवारांची माहिती घेत होतो, तेंव्हा सगळीकडून धंगेकर यांच नाव यायचे. सर्वसामन्य जनतेत मिसळून काम करणारा उमेदवार आहे, अशीच लोक आपल्याला संसदेत पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखण्याचे काम महाविकास आघाडी एकत्र येऊन करत आहोत. (Sharad Pawar On PM Narendra Modi)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संसदरत्न पुरस्कार तसेच महिलांचा द्रौपदी म्हणून केलेल्या उल्लेखाचा आधार घेत अलिकडे काही जणांचा बॅलन्स जायला लागला असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत लगावला. जीएसटीच्या माध्यमातून अगदी गोरगरीबांचे अन्न, कपडे, चपलांवर जीएसटी लावून पैसा गोळा करणारे केंद्र सरकार याच पैशातून बड्या घोटाळेबाजांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कंपन्यांकडुन खंडणी गोळ करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांना पक्षात सामावून घेतले जात असल्याने सर्वसामान्य जनतेचा भाजपवर राग आहे. यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. यावेळी सचिन आहिर, अजित फाटक, ऍड. जयदेव गायकवाड, रोहीणी खडसे, बाळा ओसवाल यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या प्रमुखांची भाषणे झाली. कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे अंमली पदार्थाचे हब झाले आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी नेले जात असताना फक्त मी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आवाज उठविला आहे.
विरोधी पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व भाजपचा एकही नेत्याने याविरोधात आवाज उठविला नाही.
भाजप मनुवादी अजेंडा राबवत असून महिलांचा वापर केवळ ‘पॉलिटीकल’ टूल म्हणून केला जात आहे.
देशाला माझा परिवार म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारात मणिपूर मधील, उन्नाव,
हाथरसमधील बहिणींचा समावेश नाही? असा टोला लगावतानाच जी व्यक्ती जशोदाबेनला न्याय देउ शकली नाही
ती व्यक्ती यवतमाळ- वाशिममध्ये भावना गवळी या बहिणीलाही न्याय देउ शकली नाही,
असा चिमटा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी काढला. (Sharad Pawar On PM Narendra Modi)

कसबा पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांना पोलिस आणि प्रशासनाकडून त्रास देण्यात येत होता.
गुंडांकडून धमकावण्यात येत होते. तसाच प्रकार आता सुरू झाला आहे.
कुठल्याही कार्यकर्त्याला प्रशासनाकडून त्रास झाल्यास त्यांना माझा मोबाईल नंबर द्या,
त्यांची रात्र काळी कशी करायची हे मी पाहातो. – रवींद्र धंगेकर, उमेदवार, पुणे लोकसभा मतदार संघ

पराभव दिसू लागल्याने विरोधक वैयक्ति टीका करू लागले आहेत.
पाच वर्षात दिसला नाहीत, विकास केला नाही, नटसम्राट असे आरोप होत आहेत.
माझे संसदेतील काम आणि मतदारसंघातील कामाचा अहवाल देतो, तो पहा.
नटसम्राट, कार्यसम्राट म्हणणे परवडते. पण कोी खोके सम्राट, धोके सम्राट, पलटीसम्राट नको.
जनधन योजनेत सर्वसामान्य गरीबांची बँक खाती उघडली.
कमीत कमी डिपॉझीटच्या माध्यमातून कोट्यवधी खात्यातील रकमेचा उपयोग कर्ज बुडव्या उद्योगपतींची कर्ज माफी
आणि सरकारे पाडण्यासाठी करण्यात आली. – डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार, शिरुर लोकसभा मतदारसंघ.

कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जाताहेत. जे धमक्या देतात त्यांना माझा मोबाईल नंबर द्या.
तुम्ही दिल्लीत ज्यांना घाबरता त्यांच्या समोर संसदेत मी आणि डॉ. अमोल कोल्हे जनतेच्या प्रश्‍नांसाठी ताठ मानेने आवाज उठवतो.
आतापर्यंत संस्कार आणि कुटुंबातील निर्णयानुसार मी कधी ग्रामपंचायत, स्थानीक स्वराज्य संस्था, दूध आणि सहकार संस्थांच्या निवडणुकीत लक्ष दिले नव्हते.
परंतू यापुढील होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. – खासदार सुप्रिया सुळे, उमेदवार, बारामती मतदारसंघ.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात