…तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढू, शरद पवार यांचे सूतोवाच अन् फडणवीसांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृखाली स्थापन झालेल्या सरकारला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या काळात अधूनमधून सरकार अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले होते. त्याच बरोबर इतरही राज्यात सत्तांतरं झाली या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवारांची मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली.

या मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी राज्यातील सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले. शरद पवार यांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या खास मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. या मुलाखतीचे तीन भाग प्रकाशित करण्यात आले असून आजचा तिसरा आणि शेवटचा भाग प्रकाशित करण्यात आला.

या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर प्रामुख्याने भाष्य केलं. ठाकरे सरकारचे भविष्य काय ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता त्यावर बोलताना शरद पवार यांनी उत्तर देताना म्हटले, हे सरकार पाच वर्षे चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू असं सूतोवाच शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षाचं म्हणजे एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षाची संपूर्ण टीम आहे. ती आपल्या संबंधीत जबाबदारीचा इमॅक्ट करायला फार यशस्वी झाली हे मला दिसत नाही. विधानसभेचं चित्र आहे. विरोधी पक्षनेते देखील सगळीकडे फिरत आहेत. प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षाचं हे काम आहे, बोलणं, टीका टीप्पणी करणं. सत्ताधारी कुठे चुकत असतील तर त्याबद्दल बोलण हा विरोधकांचा अधिकार आहे. आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे, त्यांनी मान्यच केला पाहिजे. मात्र त्यांच्याकडे आकस आहे, असं दिसता कामा नये.

देवेंद्र फडणवीस यांना टोला अन् सल्ला
सत्ता येते आणि जाते. पण लोकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडायची असते. ज्यावेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी सुद्धा मुख्यमंत्री होतो. माझं मुख्यमंत्रीपद 80 साली गेलं. त्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो. पण व्यक्तिगत माझा असा अनुभव आहे, मला विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात अधिक गंमत येत होती. त्याचं एक समाधान होत. पण आज काय दिसतंय की, विरोधी पक्षनेता असं म्हणत असेल की, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझं गेलं. ते स्वीकाररायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकत नाही. आज आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्यावर दिलेली आहे, ती आपण समर्थपणे पार पाडली पाहिजे. ती पार पाडण्यासाठी पडेल ते कष्ट केले पाहिजेत. त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही, सत्ता माझ्याकडे नाही. मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही. ही भूमिका चांगली नाही, असा चिमटा काढत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like