Sharad Pawar | भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – त्रिपुरात घडलेल्या घटनेचे (Tripura Violence) पडसाद महाराष्ट्रात उमटताना पहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे. राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा जेव्हा राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचे सरकार येते तेव्हा दंगली (riots) घडतात असा थेट आरोप बोंडे यांनी केला आहे.

 

अनिल बोंडे यांनी ट्विट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप केले आहेत. बोंडे म्हणाले, अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार (Government) येते तेव्हा अशा दंगली घडतात, असा आरोप त्यांनी केला आहे. अमरावती मध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू (Hindu) रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

कारवाई फक्त हिंदुवरच का?

आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रूधुराचा वापर केला. परंतु हे मुस्लिम (Muslim) आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी (Sword) घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्यांच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.

 

अमरावती शहरात संचारबंदी

दरम्यान, अमरावती शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असताना देखील बंद दरम्यान तोडफोडीच्या घटना घडल्या.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय तर्फे संचारबंदी (Curfew) आदेश लागू करण्यात आला आहे.
त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | when sharad pawars government comes power in maharashtra riots happen says bjp-anil bonde amravati violence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा