‘सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. इतकेच नाही तर, राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये आहे असेही त्यांनी म्हटले आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. त्यानंतर पवार यांनी युतीचा आणि मोदी लाटेचा धसका घेतला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भावना मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात की, “राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद असलेल्या, सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. साहेब उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही. आणि हो आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला भरवू !” असे म्हणत महाराष्ट्र जिंकण्याचा विश्वास धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, “मी माढा मतदार संघातून लढावं अशी पक्षातील लोकांचा आग्रह होता. परंतु एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे. त्यासोबतच नव्या पीढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षातून करण्यात आला आहे” असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

ह्याहि बातम्या वाचा

लोकसभा निवडणूक २०१९ : आठवलेंवर अन्याय होऊ देणारा नाही : मुख्यमंत्री

निर्मला सीतारामन यांनी आचारसंहितेचा असा सहन केला तोटा

“जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत नाही, तोपर्यंत ऑपरेशन थांबवणार नाही”

नोटबंदीने काळा पैसा थांबणार नाही ; RBI ने दिला होता मोदींना इशारा