शरद पवारांची भविष्यवाणी नेहमीच खोटी ठरते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ साली शरद पवार यांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरली होती. यावेळी त्यांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरणार आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. शरद पवार यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या बाबत शरद पवार यांनी काल केलेल्या भाकितावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या आधीही असेच भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी पुढे खोटी ठरली. गृहकलहामुळे स्वतःला मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी अशा प्रकारचे भाष्य करू नये असे गिरीश महाजन यांनी म्हणले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते पदाचा मी राजीनामा देणार आहे असे राधाकृष्ण विखे-पाटील मला म्हणाले आहेत असे गिरीश महाजन यांनी म्हणले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाष्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्याच वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पडायला सुरुवात केली आहे. काल सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर तिकडे रणजित मोहिते पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like