शरद पवार यांचा सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांना टोला, म्हणाले – ‘प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना शरद पवार यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर असून त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सत्तास्थापने सदंर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत बोलताना म्हणाले होते की, शरद पवार हे राज्याला झालेला कोरोना आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त झालं आहे. ‘कशाला बोलायचं’. असे म्हणत शरद पवार यांनी पलटवार केला.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
इथून पुढे लोकांना कोरोना सोबत जगावं लागणार आहे
राजू शेट्टी यांची भेट.. आमदारकी बाबत राजू शेट्टी यांच्या पक्षात गैरसमज होते
पेट्रोल आणि डिझेल दर वाढ याचा परिणाम फक्त गाडीवर होत नसून सर्व गोष्टीवर त्याचा परिणाम होतो.
पडळकरांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही
बारामतीची निवडणूक लढवली… डिपॉझिट जप्त झालं…
आता सर्व व्यवहार चालू झाले पाहिजेत
कारखाने चालू न होणे हे देशासाठी चिंताजनक आहे.