शर्मिला राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शर्मिला ठाकरे या एकविरा देवीचे दर्शन करून परतत असताना अचानक पनवेलजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. आज सकाळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले.

दर्शनावरून परतत असताना सानपाडा सिग्नलवर एक ऑटो रिक्षावाला जोरात गाडीला आडवा आला. चालकाने रिक्षावाल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी थेट समोरील वाहनाला धडकली. यावेळी मागून येणारी दुसरी गाडीही शर्मिला ठाकरेंच्या इनोव्हाला धडकली.

अपघात झालेल्या गाडीमध्ये स्वतः शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांची बहीण आणि त्यांचे सचिव मोरे हे होते. शर्मिला ठाकरे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मात्र इनोव्हाचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी पहायला मिळाले.

visit : Policenama.com