Shashikant Shinde | राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही – शशिकांत शिंदे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्हा बँक निवडणुकीत (satara distric bank election) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा धक्कदायक पराभव झाला. शिंदे यांचा एका मताने जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendra raje bhosale) यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (dnyandev ranjane) यांनी पराभव केला. त्यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) कार्यालय फोडले. जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे यांच्या पराभवामागे राष्ट्रवादीच्याच लोकांचा हात असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. त्यातच आता निकालानंतर पहिल्यांदाच आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) माध्यमांसमोर आले. निकालावर प्रतिक्रिया देताना बँकेच्या निवडणुकीत १०० टक्के राजकारण झाले असून माझ्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचेच काही नेते जबाबदार असून हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

 

शशिकांत शिंदे म्हणाले की, उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांना पॅनेलमध्ये घेण्यावरून सुरुवातीला विरोध होता. तो कायमही राहिला पण शेवटी असं काय घडलं किंवा महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी जादूची कांडी फिरवली की उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येता. दुसरीकडे पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकारण न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

 

जयंत पाटील काय म्हणाले ?

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, माध्यमांसमोर शिंदे यांनी भूमिका मांडली हे मला नुकतेच समजले. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचे म्हणणे जाणून घेईन असे सांगतानाच राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची हे ठरवण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

निवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होती
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले की बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यामागील कारण काय आहे.
याच्या खोलात गेलेलो नाही. पण शिंदे यांनी हि निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती.
निवडणूक निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक करणे हि घटना दुर्दैवी असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.

 

Web Title :- Shashikant Shinde | satara dcc bank election 2021 mla shashikant shinde criticizes mp udayanraje bhosale and others

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये

Pune Crime | दिघीतील लॉजवरील धक्कादायक घटना ! 35 वर्षीय महिलेची हत्या करुन युवकाची आत्महत्या

Relationship Advice Tips | जर तुम्ही सुद्धा जोडीदारावर काढत असाल अति राग, तर असा होतो त्याच्यावर परिणाम