मुंबई एअरपोर्टवर पोहोचली शेफाली जरीवाला, म्हणाली – ‘फक्त भीती’ ! शेअर केला प्रवासाचा ‘निराशाजनक’ अनुभव

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अलीकडेच लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डोमेस्टीक फ्लाईट्स सुरू करण्यात आल्या आहेत. बिग बॉसची एक्स स्पर्धक शेफाली जरीवाला नुकतीच मुंबई एअरपोर्टवर आली होती. पंरतु तिल इथला नजारा खूपच वेगळा दिसला जो तिनं कॅमेऱ्यात कैद केला आहे. सोबतच तिनं प्रवासाचा अनुभव देखील सांगितला आहे. शेफालीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे मुंबई एअरपोर्टवरील आहेत. सुरक्षिततेची काळजी घेत तिनं सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं आहे. मास्क लावत चेहऱ्याला शिल्डनं कवर केलं आहे. तिनं हुडीदेखील घातली आहे.

फोटो शेअर करताना शेफाली म्हणते, “मुंबई एअरपोर्ट जगातील सर्वात बिजी एअरपोर्टपैकी एक आहे. याआधी याला इतकं रिकामं रिकामं कधीच नाही पाहिलं.”

‘बहुतेक हेच न्यू नॉर्मल आहे’
शेफाली म्हणते, “असं वाटत आहे की हे निर्जीव झालं आहे. हा प्रवास खूपच निराशाजनक होता. ना हग, ना किस ना उत्साह. फक्त भीती. मी प्रार्थना करते की, लवकरच सगळं काही सामान्य व्हावं. नंतर असंही वाटतं की, बहुतेक हेच नवीन सामान्य जीवन आहे आणि हेच स्विकारावं लागेल. आशा करते असं नसावं.” शेफालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये आली होती. बिग बॉसच्या घरात असताना ती आसिम रियाजसोबत आणि घरातील इतरांसोबत झालेल्या वादानं खूपच चर्चेत आली होती.