Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचिटवर अण्णा हजारेंच्या आक्षेप; अजित पवारांच्या अडचणीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shikhar Bank Scam Case | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results) राजकारणाची गणितं बिघडलेली दिसून येत आहेत. भाजपने अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नाराज असल्याचेही समोर आले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजप (BJP) काडीमोड घेणार?, या चर्चेलाही तोंड फुटले आहे. अशात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अजित पवारांच्या प्रकरणात थेट कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत.

शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव (Manikrao Jadhav) यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर
आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव
यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. तर २९ जूनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)
आर्थिक गुन्हे शाखेनं (Mumbai EoW) अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे.(Shikhar Bank Scam Case)

दरम्यान अण्णा हजारेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. ” अचानक जेव्हा अण्णा जागे होतात तेव्हा कोणीतरी त्यांना उठवलेलं असतं ” अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)