Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट नंतर बॉलिवूडमध्ये पहायला मिळणार गब्बरचा जलवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट (Cricket) आणि बॉलिवूड (Bollywood) यांच एक खास नात असल्याचे वारंवार समोर आले आहे. कधी क्रिकेटच्या मैदानात कलाकार दिसतात तर कधी क्रिकेटर मनोरंजनाच्या शोमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे काही क्रिकेटर्सनी अभिनय क्षेत्रातही आपल नशीब आजमावलं आहे. आता या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडणार आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून शिखर धवन (Shikhar Dhawan Bollywood Entry) आहे. तो आगामी एका चित्रपटात (Movie) झळकणार असल्याचे समोर आले आहे.

 

शिखर धवनला गब्बर (Gabbar) म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध स्पोर्ट्स सेलिब्रिटी पैकी तो एक आहे. 2022 च्या आयपीएल (IPL -2022) हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून (Punjab Kings Team) खेळताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात चमक दाखवल्यानंतर आता तो कॅमेऱ्यासमोर अभिनय कौशल्यही दाखवणार आहे. बॉलिवूडच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी गब्बरला चालून आली आहे. त्यामुळे आता तो अभिनय करताना दिसणार आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपटात गब्बर आपला अभिनय दाखवणार असून त्यासाठी त्याने तयारीदेखील केली आहे. (Shikhar Dhawan Bollywood Entry)

 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, डेब्यू चित्रपटाचं शिखरने नुकतच शुटिंग पूर्ण केले आहे. परंतु, या नव्या चित्रपटाच नाव अद्याप ही समोर आलेलं नाही. कलाकारांबद्दल शिखर धवनला खूप आदर वाटतो. ज्यावेळी त्याला चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्यात आली त्यावेळी तो खूप आनंदीत झाला होता. निर्मात्यांना त्या चित्रपटातील भूमिकेसाठी शिखर धवन योग्य वाटतो. ज्यावेळी निर्मात्यांनी धवनशी संपर्क साधला आणि काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी तो नकार देऊ शकला नाही. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात शिखर धवन महत्वाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Web Title :-  Shikhar Dhawan Bollywood Entry | indian cricketr shikhar dhawan ready for our bollywood debu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Gorgeous..’

Mumbai Crime | किरकोळ कारणावरून सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि त्याच्या पत्नीने मोलकरणीला केली मारहाण

Transgender Aadhaar Card | तृतीयपंथीयांना मिळणार आधार कार्ड; पुण्यात खास शिबिराचं आयोजन