शिक्रापूर पोलिसांना अरेरावी, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तीन व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्रापूर पोलिसांना (Shikrapur Police) अरेरावी करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तीन व्यक्तींविरुध्द शिक्रापूर पोलिस स्टेशन (Shikrapur Police Station) मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे (Sub-Inspector of Police Shivram Khade) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस उपनिरीक्षक खाडे हे रविवारी सकाळी दिवसपाळीचे अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते. पोलिस स्टेशन मध्ये नियमित सहकाऱ्यांसह कामकाज पाहत होते. गंभीर गुन्ह्याचे काम करत असताना कोंढापुरी येथील रिपब्लिकन पार्टी (Republican Party) ऑफ इंडिया पक्षाचा कार्यकर्ता भूषण गायकवाड, जितेंद्र वाढवे (Bhushan Gaikwad, Jitendra Wadhwe) (रा. सणसवाडी) व अनोळखी व्यक्ती हे पोलिस स्टेशन (Shikrapur Police)मध्ये खाडे यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जबाबत विचारपूस केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक खाडे यांनी याबाबत चौकशी करून सांगतो असे सांगितले. दरम्यान, आरोपी यांनी मोठ मोठ्या आवाजात बोलत फेसबुक लाईव्ह करण्याची धमकी देत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. व अरेरावी करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Wab Title :- Shikrapur police registered a case against three persons for obstructing government work

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात कधीही करणार नाहीत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा